SHARE

शिवडी - शिवजयंतीनिमित्त रविवारी शिवडी मंडळाच्या वतीने कोळीवाडा येथून बाईक रॅली काढण्यात आली होती. ही रॅली शिवडी मतदार संघातील गाडीअड्डा, इंदिरानगर, रामनगर, कॉटनग्रीन, जकेरीया बंदर, बीडीडी चाळ, टिळकनगर, सुंदर टॉवर, हिराजीबाग, टी. जे. रोड, राष्ट्रीय हॉटेल येथून आझाद नगरपर्यंत काढण्यात आली. दरम्यान, 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या रॅलीत जवळपास 300 हून अधिक बाईकस्वार सहभागी झाले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या