• 'रेटिंग्ज ऑफ अ मॅड मॅन' पुस्तक प्रकाशित
SHARE

वांद्रे येथे पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रसिद्ध कलाकार अबू मलिक यांनी लिहलेल्या 'रेटिंग्ज ऑफ अ मॅड मॅन' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध संगीतकार अनू मलिक, अभिनेता तुषार कपूर आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव उपस्थित होते.या पुस्तकात अबू मलिक यांनी त्यांच्या व्हाट्सअॅपमधील ग्रुपची चर्चा आणि संदेशाचे रुपांतर पुस्तकात केले आहे. या पुस्तकातील अबुसिम्स या चॅप्टरमध्ये लोकप्रिय मिथके आणि संकल्पनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण अशा सत्य घटनांचा पर्दाफाश करताना अनेक मिथकांचा फुगा फोडला आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण पुस्तक त्यांनी व्हाट्सअॅपवरच लिहलेले आहे. 'द बिग क्वेश्चन' नावाच्या कार्यक्रमात या पुस्तकामध्ये जे विषय हाताळले गेले आहेत, त्यावरच चर्चा करण्यात आली. पुस्तकांची दुकाने, अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर हे पुस्तक उपलब्ध आहे.


लेखक अबू मलिक यांच्याबद्दल

अबू मलिक हे भारतातील लाईव्ह शो सुरू करणारे पहिले कलाकार आहेत. त्यांनी जगभरात आतापर्यंत साधारण 10 हजार लाईव्ह शोची निर्मिती केली आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्यांसोबत त्यांनी काम देखील केले आहे. अबू मलिक हे संगीत पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आहेत. विशेष म्हणजे ते आपल्या फोनवरच त्यांचे विचार आणि कथा लिहीत असतात आणि फोन हेच त्यांच्या लिखाणाचे माध्यम आहे.

आपला प्रत्येक दिवस हा अगदी परिपूर्णपणे आणि फार गंभीरपणे न घेता जगला पाहिजे. वॉट्सअॅप हे मोठया प्रमाणावर वापरले जाणारे माध्यम आहे. त्यामुळे आपल्या संवेदनांची पद्धतीच कशी बदलली आहे, याचा ऊहापोहसुद्धा या पुस्तकात आहे.
अबू मलिक, लेखकडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या