Advertisement

कोण बनणार बिग बॉसचा नवा कॅप्टन?

वीकेंड आला की एलिमेशन आणि आठवड्याची सुरुवात झाली की पुन्हा नवा टास्क आणि कॅप्टन्सीचं कार्य हा जणू बिग बॉसच्या घरातील नियमच बनला आहे. आता या आठवड्यात नवा कॅप्टन कोण बनणार याची उत्सुकता लागली आहे.

कोण बनणार बिग बॉसचा नवा कॅप्टन?
SHARES

वीकेंड आला की एलिमेशन आणि आठवड्याची सुरुवात झाली की पुन्हा नवा टास्क आणि कॅप्टन्सीचं कार्य हा जणू बिग बॉसच्या घरातील नियमच बनला आहे. आता या आठवड्यात नवा कॅप्टन कोण बनणार याची उत्सुकता लागली आहे.


७८ दिवस पूर्ण

बिग बॉस मराठीच्या घरामधून अभिजीत केळकर बाहेर पडला आहे. शनिवारी वीकेंड डावामध्ये महेश मांजरेकरांनी अभिजीतची चांगलीच शाळा घेतली. त्याने केलेल्या चुकांवर बोट ठेवत हा एपिसोड तुलाच डेडीकेट असल्याचंही मांजरेकर म्हणाले. बिग बॉसच्या घरात अक्षरश: उघडा पडल्यानंतर अभिजीत केळकरची घरातून गच्छंतीही झाली. बिग बॉस सुरू होऊन ७८ दिवस पूर्ण झाले असून, आता या आठवड्यात घराचा कॅप्टन बनण्याचा मान कोणत्या सदस्याला मिळतो ते पहायचं आहे.


नवे टास्क

नवीन आठवडा सुरू झाला आहे. त्यामुळं बिग बॉसच्या घरामध्ये नवी आव्हानं, नवे टास्क रंगणार आहेत. बिग बॉस सदस्यांवर घरातील कॅप्टन्सीच्या टास्कसाठी उमेदवार निवडण्याचं कार्य सोपवणार आहेत. घराच्या कॅप्टनवर संपूर्ण घराची जबाबदारी असते. त्यामुळं कॅप्टन्सी टास्कमध्ये निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारानं घराचा कॅप्टन होण्यासाठी पात्र असणं महत्वाचं आहे. जो सदस्य कॅप्टन होण्यास पात्र नाही त्याला उमेदवारी मिळण्यापासून थांबवायचं आहे. त्यामुळं एखादा उमेदवार निवडताना तो सदस्य घराचा कॅप्टन होण्याची क्षमता बाळगतो का? हे लक्षात घेणे महत्वाचं ठरतं. 


पँट स्वीमिंग पूलमध्ये

एकीकडं बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनतं हे समजेलच, पण दुसरीकडं सदस्यांची दंगा-मस्ती सुरूच आहे. कधी वादविवाद करणारे सदस्य अचानक रंगात येतात आणि धमाल करत असल्याचं आपण आजवर पाहिलं आहे. आता अभिजीत बिचुकले आणि स्वीमिंग पूल यांचा खेळ पहायला मिळणार आहे. बिचुकलेनं असं काहीतरी केलं आहे, ज्यामुळं शिवानी त्याची पँट स्वीमिंग पूलमध्ये टाकायला गेली. त्यावर किशोरी शहाणे म्हणत आहेत की, बिचुकलेंना स्वीमिंग पूलमध्ये टाकलं तरी चालेल पँट नाही टाकायची. बघूया आता बिचुकलेला शिव स्वीमिंग पूलमध्ये टाकू शकेल का?



हेही वाचा -

आता बस्स… बस्स…

जाॅनी मेरा नाम..!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा