Advertisement

जाॅनी मेरा नाम..!


SHARES

कॅामेडीयन जॅानी लिव्हर यांनी 'एक टप्पा आऊट' या स्टॅड अप कॅामेडी रिअॅलिटी शोद्वारे मराठी छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या या शोमध्ये जॅानी परीक्षकाची भूमिका बजावत स्पर्धकांच्या कलागुणांचं मूल्यमापन करण्यासोबतच त्यांना मार्गदर्शनही करत आहेत. त्यांच्या जोडीला मराठी चित्रपटसृष्टीतील कॅामेडी किंग भरत जाधव आणि कॅामेडी क्वीन निर्मिती सावंत आहेत. या शोच्या सेटवर जॅानी यांचा वाढदिवस एका अनोख्या शैलीत सेलिब्रेट करण्यात आला.

जॅानी यांनी स्पेशल मुलांसोबत केक कापून बर्थडे सेलिब्रेशन केलं. १४ आॅगस्टला जॅानी लिव्हर यांचा वाढदिवस असून त्या दिवशी 'एक टप्पा आऊट'चा हा विशेष भाग प्रसारीत करण्यात येणार आहे. तत्पूर्वी जॅानी लिव्हर यांनी वाढदिवसाचे हे अनमोल क्षण 'मुंबई लाइव्ह'सोबत शेअर केले.हेही वाचा  -

गृहप्रवेशाच्या दिवशी श्री लक्ष्मी-श्री विष्णू विरह

किशोरी बनल्या बिचुकलेची आई
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा