Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
60,07,431
Recovered:
57,62,661
Deaths:
1,19,859
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,810
789
Maharashtra
1,21,767
9,371

किशोरी बनल्या बिचुकलेची आई

बिग बॉसचं घर जसं मूडी आहे तशीच इथली माणसंही आहेत. त्यामुळं या घरात कधी काय घडेल याचा नेम नाही. अभिजीत बिचुकलेची आई घरी येऊन गेल्यानंतर आता किशोरी शहाणे त्याच्या बिग बॉसमधील आई बनल्याचं पहायला मिळणार आहे.

किशोरी बनल्या बिचुकलेची आई
SHARES

बिग बॉसचं घर जसं मूडी आहे तशीच इथली माणसंही आहेत. त्यामुळं या घरात कधी काय घडेल याचा नेम नाही. अभिजीत बिचुकलेची आई घरी येऊन गेल्यानंतर आता किशोरी शहाणे त्याच्या बिग बॉसमधील आई बनल्याचं पहायला मिळणार आहे.


मजेदार टास्क

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेले पाहुणे सदस्यांना आज एक मजेदार टास्क देणार आहेत. या टास्कमुळं घरातील वातावरण जरा हलकं होणार आहे. सध्या 'ये रे ये रे पैसा २'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेला संजय नार्वेकरही बिग बॉसच्या सेटवर पोहोचला. त्यानं किशोरी शहाणे यांना सांगितलं की, टास्कमध्ये तुम्ही बिचुकलेची आई आणि ते तुमची मुलगी बनतील. हे ऐकल्यावर बिचुकले यांना आश्चर्याचा धक्का बसला. 


वेण्या घालून शाळेमध्ये

इतकंच नव्हे तर संजय पुढे म्हणाला की, यांना दोन वेण्या घालून शाळेमध्ये पाठवायचं आहे. यावर मात्र बिचुकले म्हणाला की, संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे असं नको. त्यावर सगळ्यांचं म्हणणं होतं की, मग काय झालं? किशोरी यांनी बिचुकलेला दोन वेण्या घालून दिल्या. त्यानंतर किशोरी यांना बिचुकले म्हणाला की, आई तू मला शाळेमध्ये घालतंस? पण हे जरा वेगळं दिसत आहे. असं म्हणून बिचुकलेनं गाणं म्हणायला सुरुवात केली.


मस्करीची कुस्करी

'आई माझ्या लग्नाची गं का तुलाच झाली घाई...'या गाण्यावर ताल धरत बिचुकलेनं आपला एक वेगळाच रंग बिग बॉसच्या घरात दाखवला. त्यावर किशोरी म्हणाल्या की, लग्न नाही शाळा. त्या पुढं म्हणाल्या की, त्यांचं असं म्हणणं आहे की, त्यांना या घरामध्ये आल्यावर गाणीच आठवत नाहीत. हो ना अस्मी? या टास्कमध्ये सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली. बिग बॉसच्या घरात मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळं हा टास्क सदस्यांनी धमाल मस्ती करतच पूर्ण केला की त्यांच्यात काही वितुष्ट आलं ते बिग बॉसमध्ये पुढे पहायला मिळेल.हेही वाचा  -

चंकीचा ‘साहो’ अंदाज पाहिला का?

प्रियदर्शन म्हणतोय ‘जागो मोहन प्यारे'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा