Advertisement

प्रियदर्शन म्हणतोय ‘जागो मोहन प्यारे'

आजवर बऱ्याच नाटकांनी रंगभूमीवरून मोठ्या पडद्याकडे झेप घेत आपली व्यापकता रसिकांसमोर सादर केली आहे. आता ‘जागो मोहन प्यारे’ हे नाटकही चित्रपटरूपात रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

प्रियदर्शन म्हणतोय ‘जागो मोहन प्यारे'
SHARES

आजवर बऱ्याच नाटकांनी रंगभूमीवरून मोठ्या पडद्याकडे झेप घेत आपली व्यापकता रसिकांसमोर सादर केली आहे. आता ‘जागो मोहन प्यारे’ हे नाटकही चित्रपटरूपात रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

मैलाचा दगड 

काही नाटकं कलाकारांसाठी मैलाचा दगड ठरतात. ‘जागो मोहन प्यारे’ हे असंच एक नाटक आहे, ज्यानं सिद्धार्थ जाधवला एका वेगळ्याच रूपात सादर केलंच, पण त्याच्या अभिनयकौशल्याला एका वेगळ्या उंचीवर नेत नाट्यरसिकांचं यशस्वी मनोरंजनही केलं. आता हे नाटक चित्रपट रूपात पहायला मिळणार आहे. ‘मस्का’ या मराठी चित्रपटाच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवनं ‘जागो मोहन प्यारे’ हा चित्रपट बनवला आहे. याचं लेखन प्रियदर्शननंच केलं असून, प्रस्तुती अमेय विनोद खोपकर करत आहेत.

मोहनची भूमिका

‘जागो मोहन प्यारे’ या नाटकामध्ये मोहनची भूमिका केलेला सिद्धार्थ चित्रपटातही शीर्षक भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या जोडीला अनिकेत विश्वासराव आणि दीप्ती देवी यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शनही प्रियदर्शन जाधवनंच केलं होतं. चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पुढल्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रंगभूमीवर धमाल करणारा मोहन चित्रपटाच्या माध्यमातूनही रसिकांना मोहिनी घालण्यात यशस्वी होतो का ते पहायचं आहे.



हेही वाचा -

मुंबईततील समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी सेव्हन डी थिएटर

मुंबई-नाशिक महामार्ग महिनाभर बंद?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा