Advertisement

मुंबईतील समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी 'सेव्हन डी' थिएटर

पर्यटकांना मुंबईकडे आणखी आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळानं 'सेव्हन डी मिनी थिएटर ऑन व्हील' सुरू केले आहे.

मुंबईतील समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी 'सेव्हन डी' थिएटर
SHARES

मायानगरी मुंबईत असलेल्या समुद्र किनारी पर्यटकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. या पर्यटकांना मुंबईकडे आणखी आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळानं 'सेव्हन डी मिनी थिएटर ऑन व्हील' सुरू केले आहे. थ्री डीची पुढची आवृत्ती आहे. या सेव्हन डी थिएटरमुळं पर्यटकांना लघुचित्रपटाचा सात डायमेन्शन्समध्ये (सेव्हन डी) आनंद घेता येणार आहे.

मंत्रालयात शुभारंभ

एमटीडीसीच्या 'सेव्हन डी मिनी थिएटर ऑन व्हील'चा मंगळवारी मंत्रालयात पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मिनी थिएटर ऑन व्हील हे मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, बँड स्टँड आदी ठिकाणी उपलब्ध असणार आहे.

किरकोळ शुल्क

यासाठी पर्यटकांना किरकोळ शुल्क देऊन यावर विविध लघुपट, कार्टुन्स आदींचा ७ डायमेन्शन्समध्ये आनंद घेता येणार आहे. पयर्टन मंत्री रावल यांच्या हस्ते 'पर्यटन पर्व' या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसंच, यावेळी महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचं उदघाटन झालं.



हेही वाचा -

सुषमा स्वराज यांचं निधन, सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली

बेस्ट कामगारांचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संप



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा