Advertisement

चंकीचा ‘साहो’ अंदाज पाहिला का?

‘बाहुबली’नंतर ‘साहो’ या प्रभासच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या चंकी पांडेचा काहीसा हटके लुक प्रदर्शित करण्यात आला आहे.

चंकीचा ‘साहो’ अंदाज पाहिला का?
SHARES

‘बाहुबली’नंतर ‘साहो’ या प्रभासच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या चंकी पांडेचा काहीसा हटके लुक प्रदर्शित करण्यात आला आहे.

१५ आगस्टला रिलीज

१५ आगस्टला रिलीज होणारा प्रभासचा बिग बजेट ‘साहो’ ३० आगस्टपर्यंत पुढे सरकला आणि प्रभासच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली गेली. या चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याखेरीज अलीकडच्या काळात खूप चुझी बनलेला अभिनेता चंकी पांडेही एका वेगळ्या रूपात समोर येणार आहे. प्रभास, श्रद्धा, नील नीतिन मुकेश आणि अरुण विजय यांच्या लुकनंतर या चित्रपटातील चंकीचा लुक दर्शवणारं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

देवराजची भूमिका

आश्चर्यकारक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कधी घाबरवणाऱ्या तर कधी हसवणाऱ्या चंकीनं ‘साहो’मध्ये देवराजची भूमिका साकारली आहे. बर्गंडी रंगाच्या सूटमध्ये असलेला ‘साहो’मधील चंकीचा लुकही त्याच्या चाहत्यांना काहीसा आश्चर्याचा धक्का देणारा आहे. आपल्या गंभीर नजरेनं भयभीत करणारा चंकीचा हा अंदाज प्रेक्षकांना कसा वाटतो ते पहायचं आहे. वाढलेली दाढी-मिशी, हातात सिगार आणि बॅग्राऊंडला लागलेली आग यातून हे कॅरेक्टर नेमकं कसं आहे याचा अंदाज बांधणं तसं कठीण आहे.

पहिला चित्रपट

‘हाऊसफुल २’मध्ये आखिरी पास्ता नावाचं विनोदी कॅरेक्टर साकारणारा चंकी ‘साहो’मध्ये एका वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. नेहमीच आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर लक्ष वेधून घेणारा चंकी या मल्टीस्टारर चित्रपटातही आपलं वेगळंपण सिद्ध करेल यात शंका नाही. प्रभास आणि श्रद्धा यांचा पहिला चित्रपट असलेला ‘साहो’ हिंदीसह तमिळ, तेलुगू या दक्षिणात्य भाषांमध्येही शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, अरुण विजय आणि मुरली शर्मा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजीत यांनी केलं आहे.



हेही वाचा -

कर्जधारकांना खूशखबर! आरबीआयने केली व्याजदारांत ०.३५ टक्क्यांची कपात

मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेला २० कोटींचं नुकसान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा