Advertisement

गृहप्रवेशाच्या दिवशी श्री लक्ष्मी-श्री विष्णू विरह

ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हीजनच्या जमान्यापासून आजतागायत पौराणिक मालिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारीत होणारी 'श्री लक्ष्मीनारायण' ही मालिकाही त्यापैकीच एक ठरली आहे.

गृहप्रवेशाच्या दिवशी श्री लक्ष्मी-श्री विष्णू विरह
SHARES
Advertisement

पौराणिक मालिकांचा आपला वेगळा चाहतावर्ग आहे. पुराणातील देवादिकांच्या कथा दाखवणाऱ्या मालिकांमध्ये सध्या लोकप्रिय असलेली 'श्री लक्ष्मीनारायण' ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. यात गृहप्रवाशाच्या दिवशी झालेला श्री लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचा विरह पहायला मिळणार आहे.


अलौकिक विवाह सोहळा

ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हीजनच्या जमान्यापासून आजतागायत पौराणिक मालिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारीत होणारी 'श्री लक्ष्मीनारायण' ही मालिकाही त्यापैकीच एक ठरली आहे. श्री लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची कथा सांगणाऱ्या 'श्री लक्ष्मीनारायण' मालिकेमध्ये नुकताच लक्ष्मी नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा पार पडला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर नेत्रसुखद बनवण्यात आलेल्या या सोहळ्यानं छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या डोळ्यांचं जणू पारणं फेडल्यानंतर आता या मालिकेत एक वेगळाच ट्रॅक पहायला मिळणार आहे.


विष्णु सहस्त्रनामावलीचा जाप 

देव देवतांच्या साक्षीनं लक्ष्मीनारायणाचा विवाह सोहळ्याच्या सर्व विधी पार पडल्या गेल्या. या सोहळ्यामध्ये अलक्ष्मीनं कोणत्याही प्रकारचं विघ्न आणू नये म्हणून तिला एका खोलीमध्ये बंद करून ठेवण्यात आलं होतं. कारण तिचा या विवाहाला पहिल्यापासूनच विरोध होता. परंतु आता लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडला असून, वैकुंठामध्ये श्री लक्ष्मीचा मोठ्या थाटामाटात गृहप्रवेश होणार आहे. याचवेळी पृथ्वीलोकावर नारायणांच्या एका भक्ताला त्यांच्या दर्शनाची आस लागली आहे. ती भक्त विष्णु सहस्त्रनामावलीचा जाप करण्यात मग्न आहे. ही भक्त म्हणजे वेदवती. नारायणाच्या भेटीसाठी वेदवती आतुर झाली आहे. 


लक्ष्मीचा रोष

आपल्या भक्ताची हाक ऐकून तिला दर्शन देण्यासाठी श्री विष्णू पृथ्वीलोकावर येतात. त्यामुळं देवलाकोत श्री लक्ष्मीला मात्र ऐन गृहप्रवेशाच्या वेळी श्री विष्णूंपासून दूर रहावं लागतं. लक्ष्मी आणि नारायण यांचा संसार आता कुठे सुरू होत आहे. श्री लक्ष्मीच्या गृहप्रवेशाच्या दिवशीच त्यांच्या पदरी पतीचा विरह आल्यानं श्री लक्ष्मीचा ओढावलेला रोष विष्णू कसा दूर करतील? यावर काय मार्ग काढतील? हे 'श्री लक्ष्मीनारायण' या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पहायला मिळणार आहे.हेही वाचा  -

चंकीचा ‘साहो’ अंदाज पाहिला का?

प्रियदर्शन म्हणतोय ‘जागो मोहन प्यारे'संबंधित विषय
Advertisement