Advertisement

आता बस्स… बस्स…

‘आता बस्स’ या मराठी चित्रपटातील ‘वंदे मातरम…’ म्हणजेच ‘आता बस्स…’ या देशभक्तीवर शीर्षकगीताचं तसंच चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण नुकतंच मुंबईत करण्यात आलं.

SHARES

देशात कोणताही बदल घडवण्याची क्षमता सामान्य जनतेमध्ये असल्याचं दाखवणाऱ्या ‘आता बस्स’ या मराठी चित्रपटातील ‘वंदे मातरम…’ म्हणजेच ‘आता बस्स…’ या देशभक्तीवर शीर्षकगीताचं तसंच चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण नुकतंच मुंबईत करण्यात आलं. शिरीष राणे दिग्दर्शित या चित्रपटात मनोज जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री, अभिजीत पानसे, सुशांत शेलार, प्रदीप पटवर्धन, आदित्य देशमुख, संदीप कोचर या कलाकारांवर चित्रीत करण्यात आलेल्या ‘आता बस्स…’ या शीर्षकगीताच्या प्रकाशन प्रसंगी आ. प्रवीण दरेकर, अमित वाधवानी, मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक विठ्ठल भोसले, आशिष गोएल, जीवनलाल लावाडिया, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. हे गाणं ‘चक दे इंडीया’ फेम गायक कृष्णा बेवरा यांनी गायलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा