Advertisement

बोरिवलीत 'दांडिया क्वीन'सोबत पाहा 'लाइव्ह गरबा'


बोरिवलीत 'दांडिया क्वीन'सोबत पाहा 'लाइव्ह गरबा'
SHARES

नवरात्र म्हटले की आठवतो तो ९ दिवस खेळण्यात येणारा गरबा किंवा दांडिया हा नृत्यप्रकार. सगळेच नवरात्रीतल्या रास-दांडियाची आतुरतेने वाट पाहतात. नवरात्र येताच अनेकांच्या नजरा वळतात त्या बोरिवली, गोरेगाव आणि विलेपार्ले इ. भागांत होणाऱ्या गरबा कार्यक्रमांकडे. नवरात्रीत फाल्गुनी पाठकच्या गाण्यांना पहिली पसंती असते

'दांडिया क्वीन' अशी ओळख असलेली फाल्गुनी दांडिया खेळणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवते. 'परी हू में', 'मैने पायल है छनकाई' फाल्गुनीच्या या गाण्यांवर गरबा रसिकांचे पाय आपोआपच थिरकायला लागतात. यावर्षी फाल्गुनी पाठक बोरिवलीतल्या श्री प्रमोद महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे आपल्या गाण्याच्या तालावर नाचवणार आहे. बोरिवलीत होणाऱ्या या रूपारेल नवरात्री उत्सवात ३० ते ३५ हजार गरबा रसिक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

रूपारेल नवरात्री उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. रूपारेल नवरात्र उत्सवाचे आयोजन रूपारेल रिअॅलिटीतर्फे करण्यात आले आहे. शोबिज इव्हेंट कंपनीने या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी हाती घेतली आहे. तुम्हालाही या गरबा-रासमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर बुक माय शो, मेरा इव्हेंट्स आणि टीआयएक्सडीओ ( TIXDO)वर तिकीट बुक करा. एवढेच नाही तर सर्वात चांगला गरबा खेळणाऱ्या एका जोडीला ९ रात्र आणि १० दिवस स्पेनमध्ये आनंद लुटता येणार आहे.      


दिनांक २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर

वेळ  -  संध्याकाळी ७ ते रात्री १०

तिकिट दर -

एक दिवस पास - ७०० ते १००० रुपये

सीजन पास - ,२०० रुपये

व्हिआयपी पास - ,५०० रुपये



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा