Advertisement

'तारक मेहता...' मालिकेत दया बेनची पुन्हा एन्ट्री?

मालिकेपासून दूर असलेली 'दया बेन' आता पुन्हा परततेय, अशी चर्चा आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप केली नाही आहे.

'तारक मेहता...' मालिकेत दया बेनची पुन्हा एन्ट्री?
SHARES

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दया बेनच्‍या चाहत्‍यांसाठी एक खूशखबर आहे. मालिकेपासून दूर असलेली 'दया बेन' पुन्हा परततेय, अशी चर्चा आहे. १८ मे रोजी दिशा वकानी मालिकेत पुन्‍हा परततेल, असं म्‍हटलं जातंय. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही

दिशानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर दिशाला अनेक चाहत्यांनी पुन्हा मालिकेत येण्याची विनंती केली आहे. दिशा मालिकेत परत येत असेल, तर तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे

दिशानं तारक मेहता सोडल्‍याची चर्चा होती. मालिकेचे निर्माते असित कुमार हे इटलीहून परत येणार आहेत. ते सुट्‍टीसाठी इटलीमध्ये आहेत. त्‍यामुळे दिशा वकानी निर्माते परत कधी येणार? याची वाट पाहत आहेत. १८ मे पासून ती सेटवर शूटिंगसाठी येणार असल्याचं म्हटलं जातंय.

दिशा वकानी सप्टेंबर, २०१७ पासून 'तारक मेहता का उलटा चश्‍मा' मालिकेपासून दूर आहे. ती प्रसूती रजेवर गेली होती. परंतु, दिशाच्या शूटिंगच्या वेळा आणि मानधनामुळे ती मालिकेपासून दूर असल्‍याचे वृत्त होतं. आता ती परतणार असल्‍यानं तिच्‍या चाहत्‍यांना आनंद झाला आहे.



हेही वाचा

सैफ अली खानची छोट्या पडद्यावर एन्ट्री

'द कपिल शर्मा शो'मध्ये सिद्धूची पुन्हा एन्ट्री?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा