Advertisement

'द कपिल शर्मा शो'मध्ये सिद्धूची पुन्हा एन्ट्री?

चॅनलनं सिद्धूला राजीनाम देण्यास सांगितलं होतं. पण सिद्धू पुन्हा एकदा शो मध्ये परतण्याची शक्यता आहे.

'द कपिल शर्मा शो'मध्ये सिद्धूची पुन्हा एन्ट्री?
SHARES

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत टीका केल्यामुळे काँग्रेस नेता नवज्योत सिंह सिद्धूची 'द कपिल शर्मा शो' मधून हकालपट्टी करण्यात आली होती. चॅनलनं सिद्धूला राजीनाम देण्यास सांगितलं होतं. पण सिद्धू पुन्हा एकदा शो मध्ये परतण्याची शक्यता आहे.


अर्चना पूरणसिंह

सिद्धूच्या जागी अर्चना पूरणसिंह काही दिवसांसाठी आली होती. पण अर्चना पूरणसिंहचा फक्त २० भागांसाठी करार करण्यात आला होता, असं समजतंय. पण तिनं त्याहूनही अधिक भागांचं चित्रीकरण केलं आहे. पण आता कपिल आणि त्यांची टीम सिद्धूला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


कपिलचीही इच्छा 

अर्चनाचा शोबाबतचा अनुभव चांगला होता. पण ती सिद्धूप्रमाणे लोकांना आकर्षित करण्यात असमर्थ ठरली. सिद्धू सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. पण निवडणूक संपताच त्यांना शोमध्ये पुन्हा आणण्याची तयारी सुरू होईल. आतापर्यंत सिद्धूचा चॅनलसोबतचा करार संपला नाही. सिद्धूनं पुन्हा शो मध्ये यावं अशी कपिलचीही इच्छा आहे.हेही वाचा -

२० वर्षांनी पुन्हा सैफसोबत तब्बू!

गदरचा सीक्वेल येणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा