इंटरनेटवर मराठीचं अस्तित्व कमी - डॉ. गणेश देवी

अाधुनिक जमान्यात मराठीला जोपासायचं असेल, अधिकाधिक प्रमाणात माहिती मराठीतून इंटरनेटवर येणं आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केलं.

  • इंटरनेटवर मराठीचं अस्तित्व कमी - डॉ. गणेश देवी
SHARE

जगात ३० पेक्षा अधिक देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. मात्र इंरनेटवर मराठी भाषेविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे अाधुनिक जमान्यात मराठीला जोपासायचं असेल, अधिकाधिक प्रमाणात माहिती मराठीतून इंटरनेटवर येणं आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केलं. ते दादर सार्वजनिक वचनालयाच्या ४१ व्या दिवाळी अंक प्रदर्शनात बोलत होते.


धुरू हॉलमध्ये झाला कार्यक्रम

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई आणि दादर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ३ नोव्हेंबर रोजी दादरच्या धुरू हाॅलच्या पहिल्या मजल्यावर ४१ वं दिवाळी अंक प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. यावेळी डॉ. गणेश देवी यांच्यासह ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, मनोहर साळवी, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कोषाध्यक्ष, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाहक दत्ताजी कामते उपस्थित होते.
दिवाळी अंकाची व्हावी डिजिटल लायब्ररी

आज प्रिंटच्या स्वरुपात दिवाळी अंक काढले जातात. याच दिवाळी अंकांची इंटरनेटवर डिजिटल लायब्ररी तयार करणं गरजेचं आहे. मराठी भाषा मैलावर बदलते. मराठी भाषा म्हणजे २८ सावल्यांनी बनलेला सुंदर आभास आहे. जगात ६ हजार स्थानिक भाषा असल्या तरी मराठी, मल्याळम, बंगाली भाषा वगळता कोणत्याही भाषेत दिवाळी अंक निघत नाहीत. 


सांस्कृतिक वैभव

मराठीत दिवाळी अंक काढले जातात तसेच बंगलीमध्ये पूजा अंक काढले जातात. लेखिका महाश्वेता देवी यांच्या अनेक कादंबऱ्यांची सुरुवात पूजा अंकातून झालेली आहे. मराठी दिवाळी अंक डिजिटल केले तर इंटरनेटवर चांगला डेटाबेस तयार होईल. हे एक वेगळं सांस्कृतिक वैभव असेल, असं मतही गणेश देवींनी व्यक्त केलं.

या कार्यक्रमाची प्रस्तावना मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केली. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकाचे संपादक प्रकाशक यांना गणेश देवी यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या