• भाजपचा भव्य रोजगार मेळावा
SHARE

दिंडोशी - पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवत दिंडोशीमध्ये भाजपच्यावतीनंही शनिवारी भव्य रोजगार मेळावा 2016 चे आयोजन करण्यात आलं होतं. मालाड कुरारगावयेथील त्रिवेणीनगर न्यू अपार्टमेंट येथे या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजप दिंडोशी विभागाचे नेते मोहित कम्बोज यांनी या मेळाव्याचे आयोजन केलं होतं. संध्याकाळी चार वाजेपर्यंत एक हजारांहून अधिक बेरोजगार उमेदवारांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या