Advertisement

कलागुणांना वाव देणारं प्रदर्शन


कलागुणांना वाव देणारं प्रदर्शन
SHARES

वरळी - जांबोरीतल्या कला भवनमध्ये विवध गोष्टींच प्रदर्शन भरलय. वरळीतल्या ' साईच्छा ' ह्या तरुणांच्या ग्रुप ने हे प्रदर्शन आयोजित केलय. या ग्रुपने तयार केलेल्या अकॅडमीद्वारे गरिबमुलांना ग्लास पेंटिंग,फोटोग्राफी चे हे धडे देण्यात येतात. कमीत कमी रुपयात हे शिक्षण ते मुलांमध्ये पोहचवतात. ज्यात वयाची हि काही अट नसते. आता पर्यंत जेवढ्या मुलांनी त्यांच्या अकॅडमीत शिक्षण घेतलं आहे त्याच मुलांच्या कलेला वाव मिळवा म्हणून त्यांनीच बनवलेल्या गोष्टी या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या आहेत.
‌ ह्यात ग्लास पेंटींग्स, वारली पेंटिंग्स ,कागदापासून बनवलेली ज्वेलरी , छायाचित्र असे बरेच प्रकार आहेत. अगदी लहान मुलांनी बनवलेल्या प्रोजेक्टचाही ह्यात समावेश करण्यात आला आहे. 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत खुलं असेल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा