एअर इंडिया इमारतीच्या 22 व्या मजल्यावरील आग आटोक्यात

नरिमन पॉइंट - मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. नरिमन पॉइंटमधील एअर इंडियाच्या इमारतीला मंगळवारी सकाळी 6.45 च्या सुमारास आग लागली. या इमारतीतील 22व्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीचं कारण अद्याप अजूनही अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं स्पष्ट झालंय.

Loading Comments