पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन

 Goregaon
पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन
पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन
See all

जोगेश्‍वरी - शामनगर तलाव इथं मराठी पुस्तकांचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. १० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळात हे प्रदर्शन सुरू राहणाराय. या प्रदर्शनात धार्मिक, सौंदर्य आणि आरोग्य, विज्ञान, पर्यावरण, पर्यटन, शेती, कला कौशल्य, ऐतिहासिक, कथा कादंबरी, आत्मचरित्र आदी पुस्तके वाचकांसाठी ठेवण्यात आलीत.

आयडियल बुकडेपो तसंच अजब डिस्ट्रीब्युटर यांच्या वतीनं आणि स्थापत्य समिती अध्यक्ष बाळा नर यांच्या पुढाकारानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या पुस्तकांचा जास्तीत जास्त जनतेनं लाभ घ्यावा, असं आवाहन आयडिल बुक डेपोचे मंदार नेरुरकर यांनी केलंय.

Loading Comments