आयकॉन फाऊंडेशन सोहळ्यात महिलांचा सन्मान

 Nariman Point
आयकॉन फाऊंडेशन सोहळ्यात महिलांचा सन्मान

मंत्रालय - जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र कन्या गौरव पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध 14 रणरागिणींचा सन्मान करण्यात अाला. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं

यामध्ये तेजश्री प्रधान, लता नार्वेकर, प्रिया शाह, हंसा शाह, त्रुप्ती देसाई, मंजू याग्यिक, डॉ. लिना गुप्ता, कृष्णा पाटील, गिता जैन, छाया मोदी, आदिती वाघमारे, विद्युलता पंडित, सुमन जैन पारेख, सुमीती लांडे अशा 14 जणींना गौरवण्यात आलं. विविध क्षेत्रात यशस्वी कार्याबद्दल या महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव आयएएस मनिषा म्हैसकर, नाट्य आणि सिने सृष्टीतील अभिनेत्री सुहास जोशी, एसएनडीटीच्या कुलगुरु शशिकला वंजारी आणि खाबीया ग्रुपचे चेअरमन किशोर जैन खाबिया हे देखील उपस्थित होते.

Loading Comments