अध्यात्मरंगमध्ये कबीरांवर व्याख्यान


  •  अध्यात्मरंगमध्ये कबीरांवर व्याख्यान
  •  अध्यात्मरंगमध्ये कबीरांवर व्याख्यान
SHARE

दादर - दादर माटुंगा सांस्कृतिक कला केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अध्यात्मरंग कार्यक्रमाला सोमवारी सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत यावर्षी धनश्री लेले संत कबीर यांच्यावर व्याख्यान देत आहेत.

2003 पासून आयोजित केला जाणा-या अध्यात्मरंग या कार्यक्रमात या पूर्वी ज्ञानेश्वरी , गीता यांसारख्या विषयांवर व्याख्याने झाली आहेत. कबीर यांच्यावर व्याख्यान देताना धनश्री लेले म्हणाल्या, "कबीर एका दिवसात समजणे कठीण आहे. कबीर हे माणसाला ज्ञान देणारे शिक्षक आहेत. लोकांना वेगवेगळे ज्ञान देणारे तत्वज्ञ आहेत. आपल्याला आतमधून जागे करणारे तत्वज्ञ कबीर आहेत. कबीरांच्या जन्माविषयीच्या अनेक अख्यायिका आहेत, परंतु खरा जन्मकाळ वेळ अशी कुणालाचं माहित नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या