2018मध्ये येणार नवी विक्रांत !


SHARE

मुंबई - कोचीन शिपयार्डमध्ये तयार होत असलेल्या आयएनएस विक्रांतवरून सध्या बरीच चर्चा रंगतेय. हे विमानवाहू जहाज युद्धासाठी तय्यार होण्यास कित्येक वर्षं लागू शकतील, अशी चर्चा आहे. पण 2018मध्ये ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल, असा विश्वास व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथरा यांनी व्यक्त केलाय. नौदल सप्ताहनिमित्त आयएनएस विक्रमादित्य या नौकेवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोचीन येथील शिपयार्डमध्ये सध्या आयएनएस विक्रांतचं काम सुरू आहे. दुसरा टप्पा आता अंतिम स्थितीत असल्याची माहिती लुथरा यांनी दिली. भारतीय बनावटीची ही पहिलीच विमानवाहू युद्धनौका असून ती तयार करण्यासाठी अमेरिकाही भारताला सहकार्य करतेय. फेब्रुवारीत अमेरिकेच्या इंजिनियर्सनी विक्रांतची पाहाणी केली, तेव्हा त्यांची निराशा झाल्याचं समजतं. मात्र हिंदी महासागरातला चीनचा वाढता प्रभाव पाहता विक्रांत वेळेवर नौदलात येणं, अत्यावश्यक झालंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या