भारतीय सैन्य दलाच्या ताकदीचे दर्शन

वांद्रे - प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात वांद्रे पूर्व येथे साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बर्ड परेडमध्ये विविध शाळा कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी संचलन करत तिरंग्याला सलामी दिली. इथले संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. व्हाइस अॅडमिरल रवनीत सिंग या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या ताकदीचे दर्शनही विद्यार्थ्यांना घडवण्यात आले. सीमेवर वापरल्या जाणाऱ्या आधूनिक शस्त्रांची माहितीही तीन्ही दलांकडून देण्यात आली. हे शस्त्र प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांचे मन अभिमानाने भरून आले.

Loading Comments