• छायाचित्रकारांच्या मारहाणप्रकरणी पत्रकार आक्रमक
SHARE

मुंबई - बॉम्बे हाऊस येथे वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या मारहाण प्रकरणी आता पत्रकार आक्रमक झालेत. हुतात्मा चौक ते बॉम्बे हाऊस असा धडक मोर्चा काढत आज पत्रकारांनी निषेध नोंदवलाय. काळी फित लावत पत्रकार या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेत पत्रकारांनी हा शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला. बॉम्बे हाऊस येथे बातमी कव्हर करायला गेलेल्या तीन छायाचित्रकारांना नुकतीच आमानुष मारहाण करण्यात आली होती. दरम्यान यावेळी बॉम्बे हाऊसच्या अधिकाऱ्यांनी टॉप कंपनीची सेवा रद्द केल्याचे व मारहाण करणाऱ्याला कामावरून काढण्यात आल्याची माहिती पत्रकारंना दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या