कामगार कल्याण केंद्राचा वर्धापन दिन साजरा

 Goregaon
कामगार कल्याण केंद्राचा वर्धापन दिन साजरा

गोरेगाव - गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर येथे कामगार कल्याण केंद्रामध्ये कामगार कल्याण दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलांच्या व्यक्तिमत्व विकास, वेशभुषा, हळदीकुंकू समारंभ त्याच बरोबर 'व्यसन मुक्ती कार्यक्रमात महिलांचा सहभाग' या विषयावर सुजाता आंबेकर यांनी व्यसन मुक्ती व्याख्यान दिले. यावेळी गोरेगावच्या अनेक महिलांनी उपस्थिती लावली होती.

Loading Comments