Advertisement

९ वर्षांनंतर झी मराठीवर पुन्हा येतोय 'हा' कार्यक्रम

तुम्हाला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून मार्गदर्शन हवं असेल. तर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हा कार्यक्रम तब्बल ९ वर्षांनी परत येत आहे.

९ वर्षांनंतर झी मराठीवर पुन्हा येतोय 'हा' कार्यक्रम
SHARES

तुम्हाला अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक उत्तम मंच हवा असेल, जर तुम्हाला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून मार्गदर्शन हवं असेल. तर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हा कार्यक्रम तब्बल ९ वर्षांनी परत येत आहे. हा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'.

९ वर्षांपूर्वी अनेक उदयोन्मुख कलाकारांसाठी या कार्यक्रमानं उत्तम मंच उपलब्ध करून दिला. या मंचानं अनेक कलाकार देखील दिले आहेत. आज ते कलाकार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक टॅलेंटेड युवकांना आपली कला सादर करण्याची ही सुवर्ण संधी मिळणार आहे. या मंचावरून पुढे आलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या पर्वाच सूत्रसंचालन करताना पाहायला मिळेल. या कार्यक्रमाच्या ऑडिशनला सुरुवात झाली आहे

"एखाद्या नवख्या कलाकाराला दिग्दर्शकाकडे कामासाठी पायपीट करताना आपण पाहतो. पण आमच्या बाबतीत तसं झालं नाही. वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम झी मराठी वाहिनीनं आणला आणि त्या कार्यक्रमातून आम्ही बरेच स्पर्धक कलाकार म्हणून बाहेर पडलो आणि आजही आम्ही या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहोत.'' असं 'माझ्या नवऱ्याची बायको' मधील गॅरी म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर म्हणालाहेही वाचा

स्वप्नपूर्तीसाठी एका आईनं घेतलेला 'पंगा'

अरुण गवळीची मुलगी 'ह्या' अभिनेत्याशी करणार लग्न

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा