Advertisement

वूटवर अतुल सॅाल्व्ह करणार 'द सवाईकर केस'

वूट या वायकॉम १८च्या डिजिटल व्यासपीठावर 'द सवाईकर केस' सादर केली जाणार आहे. आजवर केवळ मराठी आणि हिंदीतच नव्हे, तर दक्षिणात्य भाषेतील चित्रपटांमध्येही विविधांगी भूमिका साकारणारे अतुल कुलकर्णी या केसचा निकाल लावणार आहेत.

वूटवर अतुल सॅाल्व्ह करणार 'द सवाईकर केस'
SHARES

आज वेबसिरीजनाही मालिका आणि चित्रपटांइतकंच महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस नवनवीन ओरिजनल वेबसिरीजच्या घोषणा होत आहेत. वेबसिरीजच्या या विश्वानं कलाकारांवरही मोहिनी घातली आहे. वेळेअभावी मालिकांमध्ये कामं करायला न धजावणारे कलाकार वेबसिरीजच्या माध्यमातून आपली हौस भागवत आहेत. मराठमोळे अभिनेते अतुल कुलकर्णीही 'द सवाईकर केस' सॅाल्व्ह करण्यासाठी वेबसिरीजकडे वळले आहेत.


ओटीटी व्यासपीठावर पदार्पण

वूट या वायकॉम १८च्या डिजिटल व्यासपीठावर 'द सवाईकर केस' सादर केली जाणार आहे. आजवर केवळ मराठी आणि हिंदीतच नव्हे, तर दक्षिणात्य भाषेतील चित्रपटांमध्येही विविधांगी भूमिका साकारणारे अतुल कुलकर्णी या केसचा निकाल लावणार आहेत. 'द सवाईकर केस'मधून अतुल वूट या भारतातील एका आघाडीच्या ओटीटी व्यासपीठावर पदार्पण करत आहेत. अप्रतिम परफॉर्मन्स आणि कलाकारीसाठी ओळखले जाणारे अतुल आता टॅबलॉईड्स आणि मोबाइल्सवरही आपली छाप पाडण्यास सज्ज आहेत.




दिग्गज कलाकारांचा समावेश

या वेबसिरीजमध्ये हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील काही दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या फॅमिली थ्रिलरचं दिग्दर्शन करणार आहे. आदित्यने यापूर्वी काही मसालेदार मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रितेश देशमुखसोबतचा त्याचा 'माऊली' प्रदर्शित झाला आहे. वूटची निर्मिती असलेल्या 'द सवाईकर केस'ची कथा गोव्यात घडते. या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या सीरिजचं काम सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.


रंजक कथा

याबद्दल अतुल म्हणाले की, वूटच्या आगामी 'द सवाईकर केस'मध्ये काम करणं हा फारच छान अनुभव आहे. हे कथानक अत्यंत रंजक आहे आणि अनेक उत्तमोत्तम कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. मला नेहमीच चौकटीबाहेरच्या व अनोख्या भूमिका करायच्या होत्या आणि 'द सवाईकर केस'मधील माझ्या व्यक्तिरेखेला स्वत:चं असं एक तेज आहे जे मी पडद्यावर जिवंत करणार आहे. वूटवर अतिशय रंजक पद्धतीनं कथा मांडल्या जातात. त्यामुळेच एक कलाकार म्हणून भूमिकांसोबत आम्हाला प्रयोग करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अशा प्रगतीशील व्यासपीठाचा भाग बनणं महत्त्वाचं वाटतं.



हेही वाचा -

पेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

या शिमग्याला राजेश-भूषण आमनेसामने!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा