पेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान पेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

SHARE

विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान पेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरारहून चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक १५ ते २० मिनीटे उशीरानं सुरू आहे.


वाहतूक विस्कळीत

शनिवारी दुपारच्या सुमारास विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान पेटाग्राफ तुटला. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सर्व लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत अाहेत.  चर्चगेटहून विरारच्या दिशेनं जाणारी वाहतूक वसई स्थानकापर्यंत चालविण्यात येत आहे. त्यामुळं विरार ते नालासोपारा स्थानकातील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, पेंटाग्राफमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लवकरच वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, याचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसल्याचे समजते.हेही वाचा - 

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू

'आयपीएल'चा उद्धाटन सोहळा रद्द, शहीद जवानांना मदतसंबंधित विषय
ताज्या बातम्या