Advertisement

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू

शालेय शिक्षण विभागाना या बाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जाहीर केला असून यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच राज्यातील राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू
SHARES

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षण विभागाना याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जाहीर केला असून यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच राज्यातील राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. 


सहा महिन्यांनतर लाभ 

येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकारद्वारे विविध घोषणा करण्यात येत आहे. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता. त्यानंतर शिक्षकांनाही शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावी अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. मात्र शिक्षकांना  सातवा वेतन आयोग लागू व्हावा याबाबत अनेक अडचणी शासकीय स्तरावर निर्माण झाल्या होत्या. त्यात या आधी पाचवा व सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तब्बल पाच ते सहा महिन्यांनतर शिक्षकांना या वेतन आयोगाचा लाभ मिळाला होता. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते.


२९२६४ शिक्षकांना फायदा

अखेरीस शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी २२ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. याचा फायदा २९ हजार २६४ शिक्षकांना होणार असून केंद्राच्या तिजोरीवर १ हजार २४१.७८ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.हेही वाचा -

वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार का?

Movie Review : मनी, पॅावर आणि माईंडगेमचा गूढ प्रवाससंबंधित विषय
Advertisement