वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार का?

भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताना विरुद्ध १६ जून रोजी होणार सामना खेळू नये, अशी मागणी देशभरातून होत आहे. मात्र, याबाबतचा निर्णय केंद्र सरकारवर ढकलला असून, सरकारशी चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय होईल, असे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले आहे.

SHARE

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहिद झाले आहेत. त्यामुळं संपुर्ण देशभरात पाकिस्तानाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तसंच भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध १६ जून रोजी होणार सामना खेळू नये, अशी मागणी देशभरातून होत आहे. मात्र, याबाबतचा निर्णय केंद्र सरकारवर ढकलला असून, सरकारशी चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय होईल, असे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले आहे.


सरकारशी चर्चा

भारताचे आजी-माजी क्रिकेट खेळाडूंना वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरुद्ध होणारा सामना खेळू नये, अशी मागणी करत आहेत. देशभरातील नागरिकांसह खेळाडूंच्या वाढत्या दबावामुळे बीसीसीआयनं याबाबत सरकारशी चर्चा केल्यावर निर्णय घेण्यात येईल, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तसंच, पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा का नाही? याबाबत प्रशासकीय समितीने शुक्रवारी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान पाकिस्तानसोबत खेळण्याचा अंतिम निर्णय सरकारशी चर्चा केल्यावरच घेण्यात येईल, यावर सर्वांचे एकमत झाले. विश्वचषक स्पर्धा अद्याप तीन महिने दूर आहे. त्यामुळे याबद्दलचा निर्णय सरकार घेईल. मात्र, पाकिस्तानशी संबंधित चिंता आम्ही आयसीसीकडे व्यक्त करणार आहोत, असं राय यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा -

आयपीएलच्या १७ सामन्यांचं वेळापत्रक

युवा सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉचं लवकरच पुनरागमनसंबंधित विषय
ताज्या बातम्या