युवा सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉचं लवकरच पुनरागमन

दुखापतीतून पृथ्वी सावरला असून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन करणार आहे.

SHARE

भारताचा युवा सलामीवीर खेळाडू आणि मुंबईकर पृथ्वी शॉ लवकरच पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध डिसेंबर महिन्यात झालेल्या कसोटी मालिकेपूर्वीच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून पृथ्वी सावरला असून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन करणार आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेनं (एमसीए) शनिवारी मुंबईच्या १५ खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे. या संघात पृथ्वी शॉला ही स्थान देण्यात आलं आहे. इंदूर येथे २१ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे सोपवण्यात आले आहे.

मुंबईचा संघ :

अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, आकाश पारकर, एकनाथ केरकर, ध्रुमिल मटकर, शम्स मुलानी, शुभम रांजणे, तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस.हेही वाचा

क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून इम्रान खानच्या पोस्टरवर पडदा

पुलवामा हल्ला : विराटनं केला पुरस्कार सोहळा स्थगित


संबंधित विषय
ताज्या बातम्या