क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून इम्रान खानच्या पोस्टरवर पडदा

माजी क्रिकेटपट्टू आणि पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याच्यावर (सीसीआय) ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडियात’ असलेल्या पोस्टवर पडदा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

SHARE

पुलवामा इथं भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शनं करण्यात आली. या कृत्याच्या निषेधार्थ माजी क्रिकेटपट्टू आणि पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याच्या (सीसीआय) ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडियात’ असलेल्या पोस्टवर पडदा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही दिवसात त्याचं पोस्टरही काढण्यात येणार आहे.

बीसीसीआयची मान्यता असलेल्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवरील सीसीआयच्या मुख्यालयात क्रिकेट जगतातील अनेक नावाजलेल्या महान क्रिकेटर्सची पोस्टर्स आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपट्टू इम्रान खान याच्या पोस्टरचाही समावेश आहे. पुलवामा इथं झालेल्या भ्याड हल्यानंतर इम्रानचं सीसीआयमधील पोस्टर काढण्याचा निर्णय सीसीआयनं घेतला आहे. ‘पाकिस्तानचा माजी क्रिकेटपट्टू इम्रान खानच्या खेळाचा सर्वच आदर करतात. मात्र, देशातील जवानांवर झालेल्या भ्याड हल्यात पाकिस्तानचा सहभाग आहे. तर इम्रान हा सध्या पाकिस्तानचा पंतप्रधान आहे. भ्याड हल्यात जवान शहीद झाले, असताना आम्ही त्याचे पोस्टर सन्मान म्हणून ठेवू शकत नाही.' त्यामुळे आम्ही त्याचं पोस्टर झाकत आहोत, असं सीसीआयचे अध्यक्ष प्रेमल उदानी यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा

पुलवामा हल्ला : विराटनं केला पुरस्कार सोहळा स्थगित


संबंधित विषय
ताज्या बातम्या