या शिमग्याला राजेश-भूषण आमनेसामने!

राजेश आणि भूषण यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचं शीर्षकच 'शिमगा' आहे. नुकतंच या सिनेमातील शिमग्याचं गाणंही प्रदर्शित झालं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कोकणातील होळी म्हणजेच शिमगोत्सवाची परंपरा पाहण्याची संधी मिळणार आहे.

SHARE

माघ संपत आल्यावर चाहूल लागते फाल्गुन महिन्याची... आणि त्यासोबतच वाढते उत्सुकता होळीची... कोकणातील होळी म्हणजेच शिमगा ही एक अनोखी परंपराच आहे. हीच परंपरा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार असून, यानिमित्त राजेश श्रृंगारपुरे आणि भूषण प्रधान हे मराठीतील तगडे अभिनेते आमनेसामने उभे ठाकल्याचं पाहायला मिळणार आहे.


शिमगोत्सव पाहण्याची संधी

राजेश आणि भूषण यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचं शीर्षकच 'शिमगा' आहे. नुकतंच या सिनेमातील शिमग्याचं गाणंही प्रदर्शित झालं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कोकणातील होळी म्हणजेच शिमगोत्सवाची परंपरा पाहण्याची संधी मिळणार आहे. कोकणातील 'शिमगा' हा सण महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. कोकणात 'शिमगा' साजरा करण्याच्या विविध पद्धती आणि परंपरा आहेत. त्याचाच वेध 'शिमगा' या सिनेमात घेण्यात आला आहे.


पोस्टर रिलीज

नुकतंच या चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये राजेश आणि भूषण आक्रमक भावमुद्रेत दिसत असून, त्यांच्या मागे आगीच्या ज्वाळा आणि त्यात पेटत असणारं घर दिसत आहे. आता या ज्वाळा शिमगा संबंधित आहेत की, अजून दुसरं काही कारण आहे हे चिञपट पाहिल्यावरच समजेल. हे पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात 'शिमगा' या सणासोबत आणखी बरंच काहीतरी वेगळं आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार याची जाणीव होते.


१५ मार्चला प्रदर्शित

'शिमगा' या सिनेमाचं दिग्दर्शन निलेश कृष्णा यांनी केलं आहे. या चित्रपटात राजेश आणि भूषणच्या जोडीला कमलेश सावंत, विजय आंदळकर, सुकन्या सुर्वे यांच्याही भूमिका आहेत. यासोबतच मानसी पंड्या ही नवोदित अभिनेत्रीही या सिनेमाद्वारे चंदेरी दुनियेत पदार्पण करत आहे. गुरु ठाकूर आणि वलय यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार पंकज पडघन यांनी सुमधुर संगीत दिलं आहे. छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केलं आहे. होळीच्या म्हणजेच शिमग्याचा मुहूर्त गाठत हा सिनेमा १५ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा - 

Movie Review : मनी, पॅावर आणि माईंडगेमचा गूढ प्रवास

लॉस एंजलिसमध्ये मराठमोळा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’
संबंधित विषय
ताज्या बातम्या