घरोघरी पोहोचणार मुख्यमंत्र्यांची मिसेस!

राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची मिसेस जरी घराघरात पोहोचली तरी नवल वाटणार नाही, पण मुख्यमंत्र्यांची ही मिसेस मालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाणार आहे.

घरोघरी पोहोचणार मुख्यमंत्र्यांची मिसेस!
SHARES

राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची मिसेस जरी घराघरात पोहोचली तरी नवल वाटणार नाही, पण मुख्यमंत्र्यांची ही मिसेस मालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाणार आहे.


लागीरं निरोप घेणार 

नेहमीच काहीतरी वेगळ्या प्लॅाटवर आधारित मालिका प्रसारीत करून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या झी मराठी वाहिनीवर लवकरच काही बदल घडलेले पहायला मिळणार आहेत. सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनलेली 'लागीरं झालं जी' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील शीतलीचं गुडलक आणि अजयची आर्मीत भर्ती होण्याची प्रबळ इच्छाशक्ती प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. बऱ्याच नाट्यमय घडामोडींनंतर या मालिकेचं कथानक शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचलं आहे. या मालिकेच्या जागी 'Mrs. मुख्यमंत्री' ही नवी कोरी मालिका प्रसारीत होणार आहे.


 टीझर सुरू

'Mrs. मुख्यमंत्री' या मालिकेचा टीझरही झी मराठीवर सुरू झाला आहे. शीर्षकावरूनच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. गंमत म्हणजे या मालिकेचं शीर्षक जरी 'Mrs. मुख्यमंत्री' असं असलं तरीही ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय घटनेशी संबंधित नसल्याची माहिती वाहिनीच्या वतीनं देण्यात येत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या मिसेसच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार याचं कुतूहल सर्वांनाच होतं. आता हे रहस्य उघड झालं आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.


२४ जूनपासून सुरू

२४ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेद्वारे अमृतानं मोठ्या पडद्यावरून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. अमृतानं यापूर्वी 'मिथुन' या मराठी चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. हा चित्रपट बॅाक्स आॅफिसवर कमाल करू शकला नसला तरी यामुळं अमृताच्या करियरची गाडी मात्र सुरू झाली आहे. मोठ्या पडद्यावरील पहिला प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत नीट न पोहोचल्यानं काहीशी निराश झालेल्या अमृताला निश्चितच 'Mrs. मुख्यमंत्री' या मालिकेकडून खूप अपेक्षा असणार. या मालिकेचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्यानं रसिकांना मालिकाही आवडेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.हेही वाचा  -

जान्हवीचा डबल रोल असलेल्या 'रुह अफ्जा'चं शूटिंग सुरू

अनाथांची नाथ बनली तेजस्विनी
संबंधित विषय