Advertisement

'मुग्धपाऊल'ची रंगणार 'सूर आणि सितार' मैफिल!


'मुग्धपाऊल'ची रंगणार 'सूर आणि सितार' मैफिल!
SHARES

'सारेगमप' या कार्यक्रमातून सर्वांची मनं जिंकणारे श्रीरंग भावे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या गायनासोबतच समीप कुलकर्णींचं सितार वादन ऐकण्याची संधी मुंबईकरांना लाभणार आहे. मुंबईमध्ये ही मैफिल रंगणार आहे. 


कार्यक्रम कुठे?

'मुग्धपाऊल' या संस्थेतर्फे आयोजित 'सूर आणि सितार' हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम १६ डिसेंबर रोजी दादरच्या रविंद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे.


सुरेल संगीत मैफिलीला वाद्यवृंदाची साथ

या मैफिलीमध्ये पखवाज राजा केळकर, तबलावादक यतिन मोकाशी, तबलावादक रूपक वझे, हार्मोनियम वादक हर्षल काटदरे यांची संगीत साथ असेल. यावेळी निकिता जातेगावकर निवेदन करणार आहेत.

श्रीरंग भावे यांनी 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तर 'पंचरत्न'मधील मुग्धा वैशंपायन ही या मैफीलीमध्ये साथ देणार आहेत. आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून नावाजलेले समीप कुलकर्णी हे सितार वादन करणार आहेत. त्यांना आजपर्यंत ३१ विविध पारितोषिकांनी सन्मानित केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा