Advertisement

बिग बॉसमध्ये कोण बनणार 'शेरास सव्वा शेर'?

बिग बॉसच्या घरामध्ये दर आठवड्याला एक खास कार्य सोपवण्यात येतं. यात जी टिम विजयी होते त्याला नेहमी फायदा होतो. या आठवड्यात कोण 'शेरास सव्वा शेर' ठरतो ते पहायचं आहे.

बिग बॉसमध्ये कोण बनणार 'शेरास सव्वा शेर'?
SHARES

बिग बॉसच्या घरामध्ये दर आठवड्याला एक खास कार्य सोपवण्यात येतं. यात जी टिम विजयी होते त्याला नेहमी फायदा होतो. या आठवड्यात कोण 'शेरास सव्वा शेर' ठरतो ते पहायचं आहे.


कॅप्टनसी कार्य

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये कॅप्टनसी कार्य रंगलं. ज्यामध्ये वैशाली घराची नवी कॅप्टन बनली आहे. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये शेरास सव्वा शेर हे कार्य पार पाडलं जाणार आहे. ज्यामध्ये सदस्यांनी त्यांना योग्य वाटेल त्या स्थानावर उभं राहून चर्चा करायची, त्यानंतर त्यांच्या अंतिम स्थानावर उभं राहून त्यांच्या आधीच्या क्रमांकापेक्षा ते खाली का आहेत तसंच नंतरच्या क्रमांकापेक्षा वरचढ का आहेत याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. सर्व सदस्यांनी सामंजस्यानं आणि विचारविनिमय करून सर्वानुमते निर्णय घेऊन ही प्रक्रिया पार पाडायची आहे. घरातील सदस्य किती सामंजस्यानं आणि विचारपूर्वक ही प्रक्रिया पार पाडतात ते पहायचं आहे.


बिचुकले-रुपालीमध्ये भांडण

शेरास सव्वा शेर या टास्कमध्ये अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसले यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण होणार आहे. ज्यामध्ये बिचुकले हे चार क्रमांकावर उभे आहेत आणि रुपालीचं असं म्हणणं आहे, त्या क्रमांकावर मला उभं रहायचं आहे. कारण, बिचुकले यांनी काहीही काम केलेलं नाही, तसंच ते टास्कमध्ये देखील फितूर होते. याशिवाय रूपालीनं बिचुकले यांना सांगितलं की, तुम्ही स्ट्राँग नाही, त्यावर बिचुकलेदेखील म्हणाले की, तू बोंबलत बस मी चार क्रमांक सोडणार नाही. रुपालीनं केलेल्या एका वक्तव्यावर बिचुकले खूप चिडले आणि ते म्हणाले घरापर्यंत पोहचू नकोस. रुपारी असं काय बोलली कि बिचुकले यांचा पारा चढला? आणि ते दोघांचं भांडण इतकं विकोपाला गेलं.हेही वाचा  -

शिव आणि परागमध्ये झाला वाद

कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली?
संबंधित विषय
Advertisement