शिव आणि परागमध्ये झाला वाद

बिग बॉसच्या घरात हाणामारीनंतर धक्काबुक्कीचा प्रकारही घडला आहे. नेहा आणि शिवमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत नेहा खाली पडली.

शिव आणि परागमध्ये झाला वाद
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामधून एकीकडं दिगंबर नाईक घराबाहेर पडला आहे, तर दुसरीकडं हीना पांचाळची एंट्री झाली आहे. यासोबतच बिग बॉसच्या घरात हाणामारीनंतर धक्काबुक्कीचा प्रकारही घडला आहे. नेहा आणि शिवमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत नेहा खाली पडली. नेहानं वेळोवेळी शिवला थांबायला सांगितलं; परंतु शिवनं नेहाचं ऐकलं नाही. टास्कदरम्यान बऱ्याचदा अशा गोष्टी होत असतात, पण याच टास्कदरम्यान घरामध्ये शिव आणि परागमध्ये वाद होतानाही दिसणार आहे. 


धक्काबुक्कीचा प्रकार 

बिग बॉसच्या घरात झालेला धक्काबुक्कीचा प्रकार न पटल्यानं परागनं शिवला सांगण्याचा प्रयत्न केला आणि यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. परागचं म्हणणे होतं की, नेहा पडली आणि ती त्याचा मोठा इश्यू करू शकते. हे प्रकरण शिववर शेकेल आणि हे तो त्यांच्या टीमला देखील सांगत होता. त्यावर शिवनं परागला शांत बसायला सांगितलं आणि शिवचं हेच वागणं, बोलणं परागला पटलं नाही. परागनं शिवला सांगितलं की, मी तुला चांगला सल्ला देत आहे, पण मला शिकवू नकोस असं शिवचं म्हणणं होतं. 


धमकी देऊ नकोस

मी नेहाची माफी मागितली आहे. पुढं काय होईल त्याला मी सामोरा जाईन, मी बघेन काय करायचं. शिवला पराग म्हणाला की, पुढच्या वेळेस असं वागताना विचार कर, शिवचं म्हणण होतं की, मी कृती केल्यावर विचार करत नाही, त्यावर पराग म्हणाला की, मग आम्हाला विचार करावा लागेल. असं बोलल्यावर शिव म्हणाला की, मला धमकी देऊ नकोस.  आता पराग आणि शिव यांच्यातील हा वाद कुठवर गेला हे बघायला मिळेल.हेही वाचा - 
पुनरागमन करत झीनत साकारणार सकिना बेगम

घरोघरी पोहोचणार मुख्यमंत्र्यांची मिसेस!
संबंधित विषय