Advertisement

पुनरागमन करत झीनत साकारणार सकिना बेगम

८०-९०च्या दशकात आपल्या बोल्ड अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत अनोखी क्रांती घडवणाऱ्या अभिनेत्री झीनत अमान आता सकिना बेगम या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

पुनरागमन करत झीनत साकारणार सकिना बेगम
SHARES

८०-९० च्या दशकात आपल्या बोल्ड अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत अनोखी क्रांती घडवणाऱ्या अभिनेत्री झीनत अमान आता सकिना बेगम या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


पाच वर्षांनी पुनरागमन 

बिनधास्त आणि बोल्ड अॅक्टिंग क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झीनत अमान यांनी नेहमीच काहीशा हटके भूमिकांना प्राधान्य देत सर्वांनाच आर्श्चचकित केलं आहे. ९० च्या दशकात अभिनयापासून दूर गेलेल्या झीनत यांनी त्यानंतर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यापैकी २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित 'बूम' या चित्रपटात अॅलिस ही व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेणारी ठरली. आता जवळजवळ पाच वर्षांनी झीनत रूपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.


पानिपत

अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्या आगामी बिग बजेट चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. पुन्हा एकदा ऐतिहासिक विषय हाताळणारे गोवारीकर 'पानिपत' या आगामी चित्रपटात पानिपतमधील लढाईचा इतिहास जगासमोर आणणार आहेत. या चित्रपटासाठी कर्जत येथील एनडी स्टुडिओत भला मोठा सेटही उभारण्यात आला आहे. या चित्रपटातील महत्त्वाची असणारी सकिना बेगम ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी झीनत यांची एंट्री झाली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अनिल कपूर, क्रिती सनोन आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. यंदा ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती गोवारीकर स्वत: रोहित शेलटकर यांच्या साथीनं करत आहेत.



हेही वाचा -

घरोघरी पोहोचणार मुख्यमंत्र्यांची मिसेस!

'श्री गुरुदेव दत्त' म्हणत निशिगंधा वाड आणि दिपक देऊळकर यांचं पुनरागमन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा