कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली?

'नटरंग' फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं सुरुवातीपासूनच विचारपूर्वक आपली कारकिर्द घडवली आहे. आजवर जवळजवळ २५ चित्रपटांमध्ये झळकलेली सोनाली रिलेशनशीपमध्ये असून, लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

  • कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली?
  • कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली?
  • कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली?
  • कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली?
SHARE

'नटरंग' फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं सुरुवातीपासूनच विचारपूर्वक आपली कारकिर्द घडवली आहे. आजवर जवळजवळ २५ चित्रपटांमध्ये झळकलेली सोनाली रिलेशनशीपमध्ये असून, लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


ग्लॅमरचा तडका

२००६ मध्ये 'गौरी' या चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीलाच 'गाढवाचं लग्न' आणि 'बकुळा नामदेव घोटाळे' यांसारखे चित्रपट मिळाल्यानं चर्चेत आलेल्या सोनालीनं 'नटरंग' या सुपरहिट चित्रपटात साकारलेल्या अप्सरानं सर्वांवर जणू मोहिनीच घातली. दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या 'ग्रँड मस्ती'मध्ये थेट रितेश देशमुखसोबत जोडी जमवत हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिकांना ग्लॅमरचा तडका देत रसिकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळंच रील लाईफमध्ये आघाडीच्या अभिनेत्यांसोबत जोड्या जमवणाऱ्या या अप्सरेची रियल लाईफमध्ये कोणासोबत जोडी जमली आहे, याचं कुतूहल साऱ्यांनाच आहे.

अफेअरची चर्चा 

सोनालीचं अफेअर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपूर्वी सुरू होती, पण सोनालीनं मात्र त्यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं ती रिलेशपमध्ये असल्याची चर्चा रंगू लागली. त्यामुळं सोनालीचा पारा मात्र चढला. सध्या आपण करियरवर लक्ष केंद्रित करत असल्याचं तिनं वारंवार सांगितलं आहे, पण अलिकडेच एका मुलाखतीत सोनालीनं आपल्या अफेरयच्या चर्चेला पूर्णविराम देत, 'माझं अफेअर असतं तर ते मी का लपवू', असं म्हटलं आहे. यावेळी बोलण्याच्या ओघात तिनं रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा मात्र केला आहे. कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहोत ते सांगण्याचं टाळत तिनं 'योग्य वेळ येताच त्या व्यक्तीचं नावही सांगेन', असंही म्हटलं.


किक बॅाक्सिंग

मागील काही वर्षांमध्ये मराठीतील बऱ्याच अभिनेत्री बोहल्यावर चढल्या आहेत. त्यामुळं सर्वांनाच सोनालीच्या हृदयात कोण आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. सोनालीनं मात्र सावध पवित्रा घेत त्या व्यक्तीचं नाव लपवलं असलं तरी, 'आधी एन्गेजमेंट होईल आणि नंतर लग्न', असं म्हणत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले आहेत. योग्य वेळ येताच याबाबत निर्णय घेतला जाईल असं तिचं म्हणणं आहे. मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'ती अँड ती' या चित्रपटात सोनाली साकारलेल्या बिनधास्त प्रियांकानं लक्ष वेधून घेतलं होतं. लवकरच ती राजकारणावर आधारित असणाऱ्या चित्रपटात झळकणार असून, एका आगामी चित्रपटासाठी किक बॅाक्सिंग शिकत असल्याचं समजतं.


हेही वाचा - 
पुनरागमन करत झीनत साकारणार सकिना बेगम

घरोघरी पोहोचणार मुख्यमंत्र्यांची मिसेस!

'श्री गुरुदेव दत्त' म्हणत निशिगंधा वाड आणि दिपक देऊळकर यांचं पुनरागमनसंबंधित विषय
ताज्या बातम्या