जाणत्या वयात भीवाला जातीयतेचा पहिला विखारी अनुभव

प्रसारित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरलेली स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.

  • जाणत्या वयात भीवाला जातीयतेचा पहिला विखारी अनुभव
  • जाणत्या वयात भीवाला जातीयतेचा पहिला विखारी अनुभव
SHARE

प्रसारित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरलेली स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.


अस्पृश्यतेची झळ 

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा बालपणापासूनचा प्रवास दाखवण्यात येत आहे. छोट्या भीवानं प्रेक्षकांची मन जिंकल्यानंतर या मालिकेचा पुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक ठरणार असल्याचं वाहिनीच्या वतीनं सांगितलं जात आहे. आता मालिकेत जाणत्या वयात जातीयतेचा पहिला विखारी अनुभव भीवाला येणार आहे. वडिलांच्या भेटीसाठी सातारा ते गोरेगाव प्रवास करत असताना अस्पृश्यतेची झळ भीवाला तीव्रपणे जाणवते. महार असल्याचं सांगितल्यामुळं भीवाला प्रवासासाठी टांगा मिळणंही अशक्य होतं. गयावया करुन आणि दामदुप्पट भाव देतो असं सांगितल्यानंतर अखेर त्याला टांगा मिळतो, पण त्यातही अट असते ती म्हणजे स्वत: टांगा चालवण्याची. 


तुच्छतेची वागणूक

तहानेनं व्याकूळ झालेल्या भीवा आणि त्याच्या भाच्यांना पाण्याचा घोटही कुणी देत नाही. समाजाकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक आणि मुलभूत गरजांसाठी करावा लागणारा संघर्ष भीवाच्या मनावर खोलवर परिणाम करुन जातो. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या प्रसंगानंतर भीवाची मानसिकता कशी बदलते? याची उत्कंठावर्धक गोष्ट 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेतून उलगडणार आहे. काही ठिकाणी आजही जाती-भेदाच्या घटना घडत असल्याचं आपण ऐकतो, वाचतो. जातीवादाच्या या आगीत कित्येक निरागस जीव आजही होरपळत आहेत. त्यामुळेच या मालिकेतून महामानवाचा प्रेरणादायी प्रवास दाखवत समाज प्रबोधन करण्याचा वाहिनीचा प्रयत्न आहे.


 प्रेरणादायी जीवनपट 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसं समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हाच प्रेरणादायी जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न मालिकेतून केला जात आहे. या मालिकेच्या निमित्तानं प्रेक्षकांना भीवाच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे अनुभवण्याची संधी मिळत आहे.हेही वाचा -

नीलनं व्हील चेअरवर पूर्ण केला 'बायपास रोड'चा प्रवास!

'गल्‍ली लाइफ' सांगणार लोकप्रिय भारतीय रॅपर्सची कथासंबंधित विषय
ताज्या बातम्या