Advertisement

नीलनं व्हील चेअरवर पूर्ण केला 'बायपास रोड'चा प्रवास!

अलिकडच्या काळात अभिनेता नील नितीन मुकेशनं आपल्या अनोख्या शैलीतील व्यक्तिरेखांद्वारे सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. आता 'बायपास रोड' या आगामी हिंदी चित्रपटातही तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे.

नीलनं व्हील चेअरवर पूर्ण केला 'बायपास रोड'चा प्रवास!
SHARES

अलिकडच्या काळात अभिनेता नील नितीन मुकेशनं आपल्या अनोख्या शैलीतील व्यक्तिरेखांद्वारे सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. आता 'बायपास रोड' या आगामी हिंदी चित्रपटातही तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे.


दुहेरी भूमिकेत

खरं तर या चित्रपटात नील नितीन मुकेश दुहेरी भूमिकेत दिसणार असला तरी यातील एक भूमिका त्यानं पडद्यावर साकारली असून, दुसऱ्या भूमिकेची जबाबदारी पडद्यामागे राहून पार पाडली आहे. मागच्या वर्षीच्या स्वत:च्या घरगुती गणेशोत्सवाला २५ वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधत नीलनं निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत नीलनं आपल्या होम प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला होता. 'बायपास रोड' असं काहीसं उत्कंठावर्धक शीर्षक असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन नीलचा भाऊ नमन नीतिन मुकेश यानं केलं आहे. नील-नमन यांनी नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण केलं आहे. 


गूढ गडद 

'बायपास रोड'चं शूटिंग संपल्याची माहिती देत नीलनं व्हील चेअरवर बसलेला आपला एक फोटो शेअर केला आहे. अलिबागसह लोणावळा व आसपासच्या भागात या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. नीलसोबत अदा शर्माची मुख्य भूमिका असलेला 'बायपास रोड' यंदा प्रदर्शित होणार असला तरी अद्याप रिलीज डेट घोषित करण्यात आलेली नाही. या चित्रपटात अदा एका फॅशन व्यावसायिकेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजतं. नीलनं शेअर केलेल्या व्हील चेअरवरील फोटोमुळं या चित्रपटात तो नेमका कशा प्रकारच्या भूमिकेत दिसणार याबाबतचं गूढ मात्र अधिकच गडद होतं. 


लवकरच रिलीज डेट

या चित्रपटात गुल पनाग, रजित कपूर, सुधांशू पांडे, मनीष चौधरी, वरुण सिंग राजपूत आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. मराठमोळा संगीतकार रोहन गोखलेसह संगीतकार शरीब तोशी यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. अॅक्शन डायरेक्टर जावेद करीम यांनी या चित्रपटातील धडाकेबाज स्टंटचं दिग्दर्शन केलं असून, फसाहत खान यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. शूटिंग पूर्ण झाल्यानं आता या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वेगात पूर्ण करण्यात येणार असून, लवकरच रिलीज डेटही घोषित करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं.



हेही वाचा  -

'गल्‍ली लाइफ' सांगणार लोकप्रिय भारतीय रॅपर्सची कथा

'बाबा'साठी मराठीकडे वळला संजू'बाबा'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा