Advertisement

'बाबा'साठी मराठीकडे वळला संजू'बाबा'

मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांनी हिंदीतील सेलिब्रिटीजना जणू मोहिनी घातली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी मराठीची वाट धरल्यानंतर संजूबाबा म्हणून ओळखला जाणारा संजय दत्तही मराठीच्या प्रेमात पडला आहे.

'बाबा'साठी मराठीकडे वळला संजू'बाबा'
SHARES

मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांनी हिंदीतील सेलिब्रिटीजना जणू मोहिनी घातली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी मराठीची वाट धरल्यानंतर संजूबाबा म्हणून ओळखला जाणारा संजय दत्तही मराठीच्या प्रेमात पडला आहे.


मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश 

सुभाष घई, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आदी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या सेलिब्रिटीजनी मराठी चित्रपटांचा स्वाद चाखला आहे. मराठी चित्रपटांची निर्मिती तसंच अभिनय करत त्यांनी मराठीबाबतचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. आता यांच्याच पावलावर पाऊल टाकत संजय दत्तची पावलंही मराठीची वाट चालू लागली आहेत. संजयनं पत्नी मान्यतासोबत 'बाबा' या आगामी मराठी चित्रपटाच्या निर्मितीच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. 'बाबा' चित्रपटाचं मोशन पोस्टर आज प्रकाशित करण्यात आलं आहे. 


सुनील दत्त यांना समर्पित 

२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती संजय-मान्यता यांनी संजय एस. दत्त प्रॉडक्शन्सखाली अशोक सुभेदार व आरती सुभेदार यांच्या ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सच्या सहयोगानं केली आहे. याबाबत ट्विट करत संजूबाबानं स्वत: 'बाबा'ची अधिकृत घोषणा केली आहे. संजयनं हा चित्रपट आपले वडील आणि महान कलाकार सुनील दत्त यांना समर्पित केला आहे. 'आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा', जी व्यक्ती माझ्या मागे प्रत्येक बाबतीत खंबीरपणे उभी राहिली त्यांना समर्पित करत आहे. लव्ह यू डॅड!", असं संजयनं भावूक होऊन लिहिलं आहे. याशिवाय मान्यतानं लिहिलं आहे की, "आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' आम्ही सुनील दत्त साहेबांना समर्पित करत आहोत. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आमचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणित होत गेला." 


वडील आणि मुलाची कथा

'तनु वेडस मनु'मध्ये कंगना रणौत आणि आर. माधवन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला अभिनेता दीपक डोब्रियाल 'बाबा'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपकचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. त्याच्या जोडीला नंदिता धुरी पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज आर. गुप्ता यांनी केलं आहे. त्यांनी यापूर्वी 'बकेट लिस्ट'चं सह-दिग्दर्शन आणि झी५ साठी 'धागा' या मराठी लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'बाबा'ची कथा मनीष सिंग यांनी लिहिली आहे. वडील आणि मुलाची ही कथा महाराष्ट्रातील निसर्गरम्य अशा कोकणातील एका सुंदर अशा गावात घडते. त्यामुळं कोकणातील निसर्गसौंदर्य पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी या चित्रपटात मिळणार आहे.

लिंक - https://www.youtube.com/watch?v=uEyMxOXUQGQ



हेही वाचा -

बिग बॉसमध्ये कोण बनणार 'शेरास सव्वा शेर'?

कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा