'गल्‍ली लाइफ' सांगणार लोकप्रिय भारतीय रॅपर्सची कथा

डिव्हाइन हे नाव भारतातील रॅप म्‍युझिकमध्‍ये चांगलंच पॅाप्युलर आहे. देशामध्‍ये हिप-हॉप आणण्‍यासाठी ओळखला जाणारा डिव्हाइन बीबीसी रेडिओ शोमध्‍येही झळकला आहे. डिव्हाइनचा हा प्रवास आता माहितीपटाच्या रूपात समोर येणार आहे.

SHARE

डिव्हाइन हे नाव भारतातील रॅप म्‍युझिकमध्‍ये चांगलंच पॅाप्युलर आहे. देशामध्‍ये हिप-हॉप आणण्‍यासाठी ओळखला जाणारा डिव्हाइन बीबीसी रेडिओ शोमध्‍येही झळकला आहे. डिव्हाइनचा हा प्रवास आता माहितीपटाच्या रूपात समोर येणार आहे.


पहिला माहितीपट

एका दशकापूर्वी डिव्हाइनची परिस्थिती खूप वेगळी होती. मुंबईतील पूर्व उपनगरामध्‍ये आजीसोबत राहणाऱ्या विवियन फर्नांडिसला हिप-हॉपबाबत काहीच माहीत नव्‍हतं. त्‍यानं मोठा होत असताना भारतीय संगीताचे विविध प्रकार व शेजारी सेलिब्रेशन्‍सच्‍या वेळी लावली जाणारी गाणी ऐकली आणि यातूनच त्‍याच्‍यामध्‍ये संगीताप्रती आवड निर्माण झाली. त्‍याच्‍या जीवनावर आधारित 'गल्‍ली लाइफ : द स्‍टोरी ऑफ डिव्हाइन' हा पहिला माहितीपट तयार करण्यात आला आहे.


आयकॉन बनण्‍यापर्यंतचा प्रवास

सुपारी स्‍टुडिओजसह सहयोगाने रेड बुल मीडिया हाऊसद्वारे निर्मित हा माहितीपट १ जुलै रोजी डिस्‍कव्‍हरी नेटवर्कमधील डिस्‍कव्‍हरी एसडी व एचडी, टीएलसी एसडी व एचडी, डिस्‍कव्‍हरी सायन्‍स, डिस्‍कव्‍हरी टूर्बो आणि डिस्‍कव्‍हरी तमिळ या चॅनेल्‍सवर प्रसारित करण्‍यात येईल. यानंतर १५ जुलै रोजी रेड बुल टीव्‍हीवर डिजिटल रीलीज सादर करण्‍यात येईल. ५० मिनिटांच्‍या या माहितीपटामध्‍ये डिव्हाइनच्‍या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती, त्‍याचे जिवलग मित्र आणि त्‍याच्‍या उल्‍लेखनीय प्रवासामध्‍ये सतत त्‍याच्‍यासोबत असलेल्या लोकांसोबत एका किशोरवयीन मुलाने लावलेला हिप-हॉपचा शोध ते आजचा आयकॉन बनण्‍यापर्यंतचा त्‍याचा प्रवास दाखवण्‍यात आला आहे.


हिप-हॉपनं कलाटणी 

या माहितीपटाबाबत आपलं मनोगत व्यक्त करत डिव्हाइन म्‍हणाला की, माझा आतापर्यंचा प्रवास अविश्‍वसनीय व अद्भुत आहे. असं वाटतं स्‍वप्‍न पूर्ण झालं आहे. मला आवडणारी गोष्ट साध्‍य करण्‍यासह त्‍यासाठी इतरांची प्रशंसा मिळाल्‍यानं खूपच धन्‍य वाटतं. हिप-हॉपनं माझ्या जीवनाला कलाटणी दिली. या माहितीपटाचं शूटिंग करण्‍याचा अनुभव खूपच चांगला होता. माझ्या गत जीवनातील सर्व आठवणींना उजाळा देणारा होता. यासाठी रेड बुल मीडिया हाऊस आणि गल्‍ली गँग एन्‍टरटेन्‍मेंटमधील माझ्या टीमचे आभार मानतो.


मुलाखतीही माहितीपटात

वर्षभर प्रॉडक्‍शन करण्‍यात आलेल्‍या हा चित्रपट डिव्हाइनच्‍या जीवनातील काही सर्वात मोठ्या व्‍यावसायिक यशावर प्रकाश टाकतो. यामध्‍ये हिप-हॉप फेस्टिवल गल्‍ली फेस्‍टचं पहिलेच पर्व आणि कॅनडामधील दौरा यांचा समावेश आहे. यामध्‍ये तो त्‍याच्‍या जीवनाला आकार देणारी ठिकाणं व लोकांना पुन्‍हा भेटताना देखील दाखवण्‍यात आलं आहे. डिव्हाइनच्‍या जीवनात अगदी महत्‍त्‍वपूर्ण असलेले शाळेतील शिक्षक, कुटुंबातील सदस्‍यांप्रमाणे मित्र, त्‍याची आई, आर्टिस्‍ट मॅनेजर्स, चित्रपटाचे दिग्‍दर्शक अक्षत गुप्‍ता अशा त्याला आयुष्यात मदतनीस ठरलेल्या व्‍यक्‍तींच्‍या मुलाखतीही या माहितीपटामध्‍ये आहेत.हेही वाचा -

बिग बॉसमध्ये कोण बनणार 'शेरास सव्वा शेर'?

कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली?
संबंधित विषय
ताज्या बातम्या