Advertisement

गेट वे ऑफ इंडियावर दिसणार मुंबईचा इतिहास!


गेट वे ऑफ इंडियावर दिसणार मुंबईचा इतिहास!
SHARES

मुंबई शहराची एक वेगळी ओळख असून पर्यटनासाठी हे शहर जगाचे आकर्षण ठरेल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यशासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालय आणि पर्यटन विभागाच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नेक्स्ट जनरेशन मॅपिंग या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जलसंधारण मंत्री राम शिंदे, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, आमदार राज पुरोहित, उद्योगपती आनंद महेंद्र यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या मॅपिंग प्रणालीद्वारे इतिहास आकर्षकपणे दाखवण्यात आला आहे. आपला इतिहास समृद्ध आहे. हा कमी वेळेत प्रोजेक्शन मॅपिंगद्वारे सादर केला आहे. हा कार्यक्रम 15 दिवस मुंबईकरांसाठी दाखवण्यात येईल. त्यानंतर या कार्यक्रमाबाबत लोकांचे मत/प्रतिक्रिया वेब पोर्टलवर घेऊन त्यानुसार आवश्यक बदल करण्यात येतील, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणाची एक वेगळी ओळख असल्याने या ठिकाणी सादर झालेल्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रणालीसाठी हिंदी भाषेसाठी आवाज दिलेले सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि मराठीसाठी आवाज दिलेले प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले.

मुंबईत येत्या 21 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक स्तरावरील व्यापार मेळावा आणि व्हिजिट महाराष्ट्र-व्हिजिट मुंब यासाठीच्या बोध चिन्हाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम पुढील 15 दिवस सायंकाळी 8 ते 9 या कालावधीत गेटवे ऑफ इंडिया येथे सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.



हेही वाचा - 

'गेट वे ऑफ इंडिया' की 'भारतद्वार'?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा