Advertisement

लग्नाला यायचं हं…!

ईशा आणि विक्रांत यांच्या विवाह सोहळ्याचे काही मनमोहक फोटो ‘मुंबई लाइव्ह’च्या वाचकांसाठी…

लग्नाला यायचं हं…!
SHARES

आज सगळीकडे चर्चा आहे ती ईशा आणि विक्रांत यांच्या विवाह सोहळ्याची… ‘तुला पाहते रे’ या मराठी मालिकेतील ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे ही जोडी आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. प्रेम प्रकरणानंतर आता ईशा आणि विक्रांत लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मालिकेच्या सेटवरही या विवाहाची जोरदार तयारी सुरू आहे. लग्नाला यायचं हं…! असं म्हणत जणू या दोघांनी आपल्या चाहत्यांना या विवाहाचं आमंत्रणचं दिलं आहे.

विक्रांत सरंजामेच्या भूमिकेत सुबोध भावे आणि ईशा निमकरच्या भूमिकेत गायत्री दातार या जोडीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. यामुळेच पुढे त्यांच्या जीवनात काय घडणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्या सर्वांनाच दोघांच्या विवाहाचे वेध लागले आहेत. या विवाह सोहळयाचे काही मनमोहक फोटो ‘मुंबई लाइव्ह’च्या वाचकांसाठी…

संबंधित विषय
Advertisement