Advertisement

वंडरवुमन-सुपरमॅनची जोडी 'आणि काय हवं'

प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी सात वर्षांनी पुन्हा एकत्र येत आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी सज्ज झाली आहे. 'आणि काय हवं' या वेबसिरीजमध्ये हे एकमेकांचे वंडरवुमन आणि सुपरहिरो बनल्याचं पहायला मिळणार आहे.

वंडरवुमन-सुपरमॅनची जोडी 'आणि काय हवं'
SHARES

प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी सात वर्षांनी पुन्हा एकत्र येत आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी सज्ज झाली आहे. 'आणि काय हवं' या वेबसिरीजमध्ये हे एकमेकांचे वंडरवुमन आणि सुपरहिरो बनल्याचं पहायला मिळणार आहे.


सात वर्षांनी एकत्र

लग्नानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आरंभ हा कायमच खास असतो. मग ते एकत्र बनवलेलं जेवण असो, एकत्र साजरा केलेला सण असो, लग्नानंतर घेतलेली गाडी असो, वा घर असो किंवा मग पहिलंवहिलं भांडण असो. या सगळ्याच गोष्टी खूप खास असतात आणि प्रत्येकासाठीच. हेच सोनेरी दिवस पुन्हा अनुभवण्यासाठी प्रिया बापट आणि उमेश कामत घेऊन येत आहेत 'आणि काय हवं' ही मराठी वेबसिरीज. या वेबसिरीजच्या निमित्तानं प्रिया आणि उमेश तब्बल सात वर्षांनी एकत्र काम करत आहेत. सहा भाग असलेल्या या वेबसिरीजचं दिग्दर्शन 'मुरांबा' फेम दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी केलं असून, अनिश जोग आणि रणजीत गुगळे निर्माता आहेत. 


त्वरित होकार 

'आणि काय हवं'च्या निमित्तानं पुन्हा प्रियाबाबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल उमेश म्हणाला की, प्रिया आणि मी सात वर्षांनंतर एकत्र झळकणार आहोत. आम्हाला एकत्र काम करण्याची खूप मनापासून इच्छा होती आणि या क्षणाची खरंतर आम्ही आतुरतेनं वाट पाहात होतो. दरम्यानच्या काळात आम्हाला 'आणि काय हवं'बद्दल विचारणा करण्यात आली. आम्हाला ही संकल्पनाच इतकी आवडली, की आम्ही त्वरित होकार दिला आणि या वेबसिरीजचा भाग बनलो. यात लग्नानंतर घडणाऱ्या अनेक छोट्या तरीही मौल्यवान गोष्टी खूपच सुंदररित्या दाखवण्यात आल्या आहेत. मुळात हा तुम्हा-आम्हा सगळ्यांचाच अनुभव आहे. त्यामुळं ही वेबसिरीज तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या खूप जवळची वाटेल.


साकेत-जुईची धम्माल

प्रियानं नेहमीच्याच बिनधास्त शैलीत या वेबसिरीजबाबत मनमोकळेपणानं सांगितलं की, ही गोष्ट तुमची आहे, माझी आहे. एकंदरच लग्नसंस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाची आहे. लग्नानंतर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेत असतानाच रोज नव्यानं प्रेमात पडणाऱ्या साकेत आणि जुईची ही कथा आहे. 'आणि काय हवं'ची कथा अतिशय साधी, सोपी आहे आणि तरीही मनाला स्पर्शून जाणारी आहे. ज्याप्रमाणे ही कथा माझ्या मनाला भावली तशी ती तुम्हालाही नक्कीच आवडेल. उमेश आणि माझी केमिस्ट्री प्रोमोमध्ये पहायला मिळतच आहे, पण वेबसिरीजमध्ये एकमेकांसाठी वंडरवुमन आणि सुपरमॅन असणाऱ्या साकेत-जुईची धम्मालही अनुभवायला मिळणार आहे.


'पहिल्या' गोष्टी

रीअल लाईफमधील उमेश-प्रिया या जोडीला पुन्हा एकत्र आणण्याचं श्रेय दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांना जातं. या वेबसिरीजबद्दल ते म्हणाले की, लग्नानंतर प्रत्येक जोडप्यानं एकत्र केलेल्या 'पहिल्या' गोष्टी मला या वेबसिरीजमध्ये दाखवायच्या होत्या. छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न. अशा अनेक गोष्टी त्यात असायला हव्यात असं वाटत होतं. यात मला प्रिया-उमेशसारखे कसलेले कलाकार लाभल्यानं आणि त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहता त्यांचं प्रेम वेबसिरीजमध्ये दाखवणं माझ्यासाठी अधिकच सोपं झालं. त्यांनी जाई आणि साकेत यांना कॅमेऱ्यासमोर सजीव केलं आहे. १६ जुलैपासून ही वेबसिरीज प्रेक्षकांना एमएक्स प्लेअरवर पहायला मिळेल आहे.

लिंक - https://youtu.be/AVQlR_oZEogहेही वाचा -

मेलबर्नला पोहोचला मुक्ता-ललितचा 'स्माईल प्लीज'

कोण बनणार कॅप्टन? रुपाली की वीणा?
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा