'रेझिंग डे' निमित्तानं प्रदर्शन

मरोळ - 2 जानेवारी म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस. याचंच औचित्य साधून पोलिसांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी खास प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात पोलिसांची हत्यारं, फोरेन्सिक सायन्स अशा विविध गोष्टींबाबत माहिती देण्यात येतेय. या प्रदर्शनात एकूण 47 स्टॅाल आहेत. नॅशनल सिक्युरिटी गार्ड, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि फोरेन्सिक सायन्स कॉलेजचे तब्बल 35 स्टॉल इथे आहेत. विविध प्रकारच्या टेस्ट्स, सायबर क्राइमची माहिती इथे येणाऱ्यांना मिळतेय.

Loading Comments