Advertisement

गुगलवर राजनंदिनीचा सर्वात जास्त शोध

अभिनेत्री शिल्पा तुळस्कर राजनंदिनीची भूमिका साकारत असून, सोशल मीडियावरही 'तुला पाहते रे' मधील राजनंदिनीची जोरदार चर्चा आहे. इतकंच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही नेटिझन्सनी राजनंदिनीचं नाव सर्वात जास्त सर्च केलं आहे.

गुगलवर राजनंदिनीचा सर्वात जास्त शोध
SHARES

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेच्या कथानकानं एक वेगळंच वळण घेतलं आहे. या मालिकेत आता राजनंदिनीची एंट्री झाली असून, मागील काही दिवसांपासून याच राजनंदिनीचा गुगलवर सर्वात जास्त शोध घेतला जात आहे.


प्रेक्षकांची मनं जिंकली

'तुला पाहते रे' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत विक्रांत सरंजामेची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे आणि इशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री दातार यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं. या मालिकेच्या कथेमध्ये मोठा ट्विस्ट आला असून. नुकतीच राजनंदिनी या भूमिकेची मालिकेत एण्ट्री झाली आहे. 


राजनंदिनीची जोरदार चर्चा

अभिनेत्री शिल्पा तुळस्कर राजनंदिनीची भूमिका साकारत असून, सोशल मीडियावरही 'तुला पाहते रे' मधील राजनंदिनीची जोरदार चर्चा आहे. इतकंच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही नेटिझन्सनी राजनंदिनीचं नाव सर्वात जास्त सर्च केलं आहे. यावरून राजनंदिनीच्या एन्ट्रीची उत्सुकता आणि मालिकेची लोकप्रियता याचा अंदाज येऊ शकतो. शिल्पानं यापूर्वी बऱ्याच चित्रपटांसोबत मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ९० च्या दशकात दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या 'ब्योमकेश बक्षी' या डिटेक्टीव्ह मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री करणाऱ्या शिल्पानं नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वीपणे काम केलं आहे.


दक्षिणात्य चित्रपटांमध्येही अभिनय

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'थोडी थोडी सी मनमर्जियां' या हिंदी चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या शिल्पानं दक्षिणात्य चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. त्यामुळेच शिल्पासारख्या अभिनेत्रीला राजनंदिनीच्या भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले होते. महाराष्ट्रासह गोवा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात यांसारख्या राज्यांतही ही मालिका भलतीच लोकप्रिय आहे. मालिकेच्या टीझरमध्ये राजनंदिनीची झलक पाहायला मिळाली, पण मालिकेत तिची एण्ट्री झाली नव्हती. आता तिच्या येण्यानं मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे.



हेही वाचा -

परिवहन विभागाला ३५० कोटींचं टार्गेट

चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला मराठी चित्रपट 'हाफ तिकीट'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा