Advertisement

संत गाडगेबाबांच्या स्मृतीदिनी स्वच्छतेचा संदेश


संत गाडगेबाबांच्या स्मृतीदिनी स्वच्छतेचा संदेश
SHARES

कफपरेड - स्वच्छतेचे जनक आणि मानवतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या 60 व्या पुण्यतिथी निमित्त कफ परेड येथील संत गाडगेबाबा चौकात धोबीघाट रहिवाशी संघाच्यावतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून विभागातील माजी नगरसेविका गीता कनोजिया यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. गाडगेबाबांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेताना माजी नगरसेविका कनोजिया म्हणाल्या की, ज्यांनी किर्तनाद्वारे अंधश्रद्धा, समाजातील वाईट चालीरीती, शिक्षणाचे महत्त्व, गरिबांची फसवणूक, पिळवणूक, जातीभेद जाणून समाजाला त्यासाठी जागृत केलं, विज्ञानवादी दृष्टिकोन दिला. त्यांनी दिलेल्या आणि राबवलेल्या कार्यक्रमाचा आदर्श ठेवून कफ परेड धोबीघाट रहिवाशी संघाच्यावतीनं स्वच्छता मोहीम तसेच अन्नदानाचा कार्यक्रम हाती घेतला आहे हे कौतुकास्पद आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा