नद्यांच्या पुनर्जीवनासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

 Oshiwara
नद्यांच्या पुनर्जीवनासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

ओशिवरा - मुंबईतील नद्यांचे मोठया प्रमाणात नाल्यात रूपांतर झाले आहे. ओशिवरा, दहिसर, मिठी, पोईसर या दूषित नद्यांच्या पुनर्जीवनासाठी पर्यावरणप्रेमी आणि रिव्हर मार्चने पुढाकार घेतलाय. या तीन नद्यांपैकी एक असलेल्या ओशिवरा नदीच्या पुनर्जीवनासाठी रविवारी पर्यावरणप्रेमी एकवटले. 

रिव्हर मार्चतर्फे रविवारी ओशिवरा नदीबाबत जनजागृती करण्यासाठी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर आणि वॉटर मॅन ऑफ इंडियाच्या नावाने ओळखले जाणारे राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. 

ओशिवरा राम मंदिर, म्हाडा, एस. व्ही. रोड ते ओशिवरा नदी परिसरातून या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. यात मोठया प्रमाणात रिव्हर मार्चचे सदस्य, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य, मार्डचे स्वयंसेवक आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेश दिले.

Loading Comments