पद्मश्री सन्मानित साधू मेहेर यांचा सत्कार


SHARE

शीव - साधू मेहेर यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने पंचशील टेनन्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रविवारी साधू मेहेर यांचा सत्कार करण्यात आला. सायन इथल्या त्रिरत्न बुद्ध विहार येथे हा सोहळा झाला.

अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपट क्षेत्रात मेहेर यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. बेस्ट समिती सदस्य मुंबई काँग्रेस प्रवक्ता रवी राजा यांच्या हस्ते मेहेर यांचा सत्कार करण्यात आला.

सायनमधील के.डी. गायकवाड नगरमध्ये साधू मेहेर यांनी आपली 40 हून अधिक वर्षे काढली आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून सिनेसृष्टीतील एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या विभागात राहत आहे, त्यामुळे हा कार्यक्रम विभागातर्फे ठेवण्यात आला असल्याचं पंचशील टेनन्ट वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस सतीश घुसाळ यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या